Sunday, August 26, 2018



मोरगाव सादीजन येथे जि.प. शाळेत बालसभा संपन्न
         बाळापूर पंचायत समितीमधील मोरगाव सादीजन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत सन 2018 -19 या शैक्षणिक सत्रातील पहिली बालसभा शनिवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
              शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ.स्मिता देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी प्रतिनिधी कु.प्रवज्जा निकाडे तर प्रमुख अतिथी म्हणून कु.शेफाली निकाडे, आदित्य राऊत याप्रसंगी उपस्थित होते.
               बालसभेची सुरुवात शैक्षणिक परिपाठाने झाली.याप्रसंगी इयत्ता 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी मराठी,इंग्रजी व हिंदी विषयाच्या कविता  उत्कृष्टपणे व कृतियुक्त सादर केल्या.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय मंत्रिमंडळ प्रमुख कु.मुक्ता कवर हिने केले.शालेय विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सचिन काठोळे,शिक्षकवृंद सर्वश्री. प्रभाकरराव निकाडे,गोपालसिंह गौतम,सुषमा मेहेकरे, वर्षा गोपनारायण,मनीषा सर्वज्ञ,आनंद नांदूरकर व श्रीकृष्ण डांबलकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

No comments:

Post a Comment